Aslam Shanedivan
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून दोन्हीकडून जोरदार तयारी केली जातेय
अशावेळी देशातील 244 ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. 7) मॉक ड्रिल होणार आहे. संवेदनशीलतेच्या दृष्टीने कॅटेगरी 1,2,3 अशी विभागणी करण्यात आली आहे.
ज्यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश असून यातील कॅटेगिरी - 1 मध्ये उरण आणि तारापूर येत असून उरणमध्ये नेव्ही बेस, जेएनपीटी, ट्रॉम्बे अणूअर्जा प्रकल्प आहेत. तसेच पालघर मधील तारापूर अणूउर्जा केंद्र यामध्ये येत असल्याने तेही संवेदनशील भाग आहेत.
तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारी भाग हा कॅटेगिरी - 3 मध्ये येत असल्याने उद्या या तिन्ही जिल्ह्यात मॉक ड्रिल होणार आहे. सिंधुदुर्ग 121, रत्नागिरी 167 आणि रायगड जिल्ह्यामध्ये 240 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे.
उरण येथे नेव्ही बेस असून येथे ट्रॉम्बे अणूअर्जा प्रकल्प आणि JNPT, A.P.M टर्मिनल्स आणि D.P. वर्ल्ड यांसारखी कंटेनर टर्मिनल्स येथे आहेत, जे संवेदनशील भाग आहेत. तर तिन्ही जिल्ह्यातील समुद्र किनारा महत्वाचा असल्याने येथे विशेष लक्ष आहे.
यामुळे या शहराला ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल आहे.
उरण हे जहाजबांधणी, बंदर आणि औद्योगिक विकासासी संबंधित उद्योगांसाठी प्रसिद्ध असल्याने महत्त्वाचे आर्थिक आणि व्यापारी केंद्र बनले आहे
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात समुद्र किनारा असून येथील काही प्रमुख समुद्री बीच प्रसिद्ध आहेत. जेथे पर्यटकांची गर्दी असते. येथील अलिबागसह गणपतीपुळे, नवगाव बंदर, काशीद, मुरुड, मांडवा, किहिम, हरिहरेश्वर आणि आक्षी हे प्रमुख समुद्री बीच पैकी एक आहेत.