अनुराधा धावडे
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ज्या इमारतीत अखेरचा श्वास घेतला त्या इमारतीचे नाव केंद्र सरकारने बदलले आहे.
स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची 16 वर्षे या वास्तूत घालवली.
या इमारतीत पंडित नेहरूंशी संबंधित अनेक गोष्टी होत्या, पंडित नेहरूंच्या निधनानंतर या इमारतीचे संग्रहालय आणि ग्रंथालयात रूपांतर करण्यात आले.
या वास्तूमध्ये पुस्तके, देशाच्या वारशाशी संबंधित अनेक वस्तू, भेटवस्तू, भित्तिचित्रे आणि इतर अनेक गोष्टींचे जतन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यापूर्वी नेहरू स्मारकाचे नाव तीन मूर्ती भवन होते.
एडविन लुटियन्सच्या इम्पीरियल कॅपिटल प्रोजेक्ट अंतर्गत 1929-30 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती.
ब्रिटीश राजवटीत तीन मूर्ती भवन हे ब्रिटीश राजवटीत भारताचे सरसेनापती असायचे.
पंडित नेहरू 1948 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा, तीन मूर्ती भवन हे त्यांचे अधिकृत निवासस्थान बनले.
नेहरूंच्या मृत्यूनंतर ही इमारत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी समर्पित करण्यात आली.