Rashmi Mane
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
भारताने मॅक्रॉन यांना 'प्रजासत्ताक दिनी' प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना राम मंदिराचे मॉडेल भेट म्हणून दिले.
मोदींनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत जयपूरमधील जंतरमंतर ते हवा महल असा रोड शो केला.
पीएम मोदींनी हवा महलबाहेर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनसोबत चहा प्यायला.
विशेष म्हणजे चहा प्यायल्यानंतर पंतप्रधानांनी यूपीआयद्वारे पैसे दिले. मॅक्रॉन यांना यूपीआय कसं काम करतं हे देखील समजून सांगितलं.
पंतप्रधान मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या 'रोड शो'ला नागरिकांची प्रंचड गर्दी पाहायला मिळाली.
रोड शो दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन एका ओपन-टॉप कारमध्ये दिसले. दोन्ही नेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या लोकांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.