Rashmi Mane
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील द्वारका येथे 'यशोभूमी' या भारतातील पहिल्या 'कन्व्हेन्शन एक्सपो सेंटर'चे उद्घाटन केले.
'यशोभूमी' हे जगातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर आहे, जे 5400 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी उद्घाटनाच्या वेळी तेथील लोकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत.
दिल्लीच्या द्वारका सेक्टर-21 ते 'यशोभूमी' द्वारका सेक्टर 25 पर्यंत विस्तारित विमानतळ एक्स्प्रेस मेट्रो लाइनच्या सुमारे 2 किलोमीटरच्या नवीन मार्गाचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले.
‘यशोभूमी’ ही वास्तू अनेक अर्थांनी खास आहे. अत्यंत भव्य आणि कल्पकतेने ही वास्तू बांधण्यात आली आहे.
'यशोभूमी' 1.8 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर बांधण्यात आली आहे.
या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकाच वेळी 11,000 लोक सहज बसू शकतील. 73 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत बांधलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य हॉल, भव्य बॉलरूमसह 8 मजली कन्व्हेन्शन सेंटर आहेत.