Rashmi Mane
इटलीतील अपुलिया येथे 50 वी G7 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर देशातील प्रमुख या समिटमध्ये उपस्थित राहणार आहेत.
समिटसाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला रवाना झाले.
या समिटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी इटली येथे दाखल होताच विमानतळावर त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
तसे तर भारत G7 शिखर परिषदेचा सदस्य नाही पण आउटरिच सदस्य देश म्हणून भारताला आमंत्रित करण्यात आले आहे.
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.