अनुराधा धावडे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण सध्या सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय राजकारणी आहेत. फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये सितारामण यांचे नाव सलग चार वर्षे येत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील सर्वात शक्तिशाली राजकारण्यांमध्ये गणल्या जातात. ममता बॅनर्जी या सलग तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत
उत्तर प्रदेश राजकारणात मायावती हे सर्वात शक्तिशाली नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मायावती भारतीय राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीदही भुषवले आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी देशाच्या राजकारणात सक्रीय झाल्या. अनेक वर्षे त्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी केंद्रातील राजकारणाची जबाबदारी सांभाळली.
देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु सध्या सर्वोच्च स्थानावर आहेत. द्रौपदी मुर्मुही झारखंडच्या राज्यपाल होत्या. या राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या.
1997 राबडीदेवी पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
प्रतिभा देवीसिंह पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. जुलै 2007 मध्ये प्रतिभाताई पाटील पहिल्यांदा भारताच्या राष्ट्रपती झाल्या.
'पीडीपी' नेत्या मेहबुबा मुफ्ती जम्मू -कश्मीर राज्याच्या 13 व्या मुख्यमंत्री आहेत. मुफ्ती यादेखील जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
वसुंधराराजे या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. वसुंधरा 1987 मध्ये राजस्थान भाजपच्या उपाध्यक्षा होत्या. त्यांची मेहनत आणि कार्यशैली पाहून त्यांना 1998-1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री बनवण्यात आले.
तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता या देशाच्या राजकारणात येण्यापूर्वी एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. जयललिता यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळही खूप गाजला.