MP Maharashtra: नऊ महिला खासदार तुम्हाला माहीत आहेत का? पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

एक अभ्यासू आणि संयमी व्यक्तीमत्त्व अशी ओळख असणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकारणी आहेत. सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत झाल्या आहेत.

Supriya Sule | Sarkarnama

बीड मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रितम मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणातील वारसा प्रितम मुंडे यांनी समर्थपणे चालवला आहे.

Pritam Munde | Sarkarnama

जळगाव जिल्हातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. पतीच्या अकाली निधनानंतर स्वतःला सावरत राजकारणात प्रचंड ध्येर्याने आपला ठसा उमटवत आहेत.

Raksha Khadse | Sarkarnama

प्रियंका चतुर्वेदी ह्या एक महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकारणी आहेत, त्या राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

Priyanka Chaturwedi | Sarkarnama

पूनम महाजन या भाजपच्या खासदार आहेत. उत्तर मध्य मुंबई या मतदार संघाच्या प्रतिनिधीत्व करतात. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजकारणाची ज्योत पूनम महाजन यांनी तेवत ठेवली आहे.

Pooanm Mahajan | Sarkarnama

पहिल्यांदाच खासदार झालेल्या डॉ. भारती पवार यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्री आहेत. दिंडोरीतून निवडून आलेल्या पवार यांच्या रुपानं नाशिकला प्रथमच केंद्रात मंत्रिपद मिळालंय.

Dr. Bharti Pawar | Sarkarnama

चित्रपटसृष्टी ते राजकारणापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे अनेक किस्से राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतात. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी मुख्यत्वे तेलुगू चित्रपटात काम केले आहे.

Navneet Rana | Sarkarnama

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील राजकारणात समर्थपणे पाय रोवून उभ्या आहेत. सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुक जिंकल्या आहेत.

Bhavana Gawali | Sarkarnama

भाजपच्या डॉ. हीना गावित या नंदुरबार मतदार संघाच्या खासदार आहेत. यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

Dr. Heena Gavit | Sarkarnama
Sarkarnama