Sunil Balasaheb Dhumal
भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्यांमधून 195 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली.
या यादीत महाराष्ट्राला स्थान नसले तरी महाराष्ट्राशी निगडित असणाऱ्या कृपाशंकर सिंह यांच्यावर भाजपने कृपा केली आहे.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघामधून कृपाशंकर सिंह यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
कृपाशंकर सिंह हे मुंबईतील भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्याकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पदही आहे.
भाजपमध्ये येण्याअगोदर कृपाशंकर सिंह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. आघाडी सरकारच्या काळात ते गृहराज्यमंत्रीही होते.
कृपाशंकर सिंह हे 1971 मध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधूनच मुंबईत रोजगाराच्या शोधात आले होते.
झोपडपट्टीत राहत असताना तेथील नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठवला आणि सामाजिक कामांमध्ये सहभाग घेणे सुरू केले.
कालांतराने त्यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी भेट झाली आणि ते राजकारणात आले.
NEXT : भाजपने उमेदवारी दिलेले १० प्रमुख नेते