बापरे! मुंबईच्या महापौर 70 लाखांचं घड्याळ वापरतात? कोणती कंपनी? कोणते मॉडेल? वाचा सविस्तर

सरकारनामा ब्युरो

लक्झरी घड्याळ

बापरे! मुंबईच्या महापौरांच्या हातात तब्बल 70 लाखांचं घड्याळ असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर या लक्झरी घड्याळाबाबत नागरिकांमध्ये कुतूहल वाढलं आहे

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

नागरिकांमध्ये उत्सुकता

मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या महापौरांच्या हातात दिसलेले हे घड्याळ नेमके कोणते? त्याची किंमत किती? असा सवाल अनेकांकडून केला जात आहे. सोशल मीडियावर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

कोणत्या कंपनीचे घड्याळ?

हे घड्याळ प्रसिद्ध स्विस लक्झरी ब्रँड Rolex चे असल्याचं सांगितलं जात आहे. Rolex हा ब्रॅण्ड जगभरात प्रसिद्ध आहे.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

नेमके कोणते मॉडेल?

महापौरांनी परिधान केलेले मॉडेल म्हणजे Rolex Cosmograph Daytona 18K Yellow Gold White Dial (Ref 126508) असल्याची माहिती समोर येत आहे. हे मॉडेल स्पोर्टी आणि क्लासिक डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

खास वैशिष्ट्ये काय?

या घड्याळाची बॉडी 18 कॅरेट येलो गोल्डची आहे आणि त्याला आकर्षक व्हाईट डायल देण्यात आले आहे. त्यामुळे ते दिसायला अत्यंत प्रीमियम आणि उठावदार वाटते.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

कोण वापरतात हे मॉडेल?

व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि अनेक राजकीय नेते यांच्यात या मॉडेलची मोठी क्रेझ आहे. लक्झरी आणि प्रतिष्ठा दाखवणारे हे घड्याळ उच्चभ्रू वर्गात लोकप्रिय मानले जाते.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

भारतातील किंमत किती?

भारतात या घड्याळाची अधिकृत किंमत साधारण 60 ते 70 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

चर्चा नेमकी कशामुळे?

मुंबईसारख्या महानगराच्या महापौरांकडे एवढे महागडे घड्याळ दिसल्याने काही जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. सध्या मात्र या घड्याळाभोवती निर्माण झालेली चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे.

Ritu Tawade Watch Mumbai BMC Mayor

Next : माजी CM च्या सुनेने राजकारण सोडून निवडला UPSC चा मार्ग; 30 व्या रँकसह झाली IAS, संपूर्ण देशात चर्चा! 

येथे क्लिक करा