Ganesh Sonawane
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हाताळते.
या महानगरपालिकेत नगरसेवकांचा पगार आणि फायदे किती आहेत, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते.
महानगरपालिकेच्या नगरसेवकांना ठराविक रकमेचा मोठा पगार दिला जात नाही. त्यांना निश्चित मासिक मानधन दिले जाते.
पूर्वी नगरसेवकांना दरमहा 10,000 रुपये इतकेच मानधन मिळत होते.
जुलै २०१७ मध्ये नगरसेवकांचे मानधन दरमहा १०,००० रुपयांवरून २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले.
वाढलेली महागाई आणि कामाच्या वाढत्या व्यापामुळे हे मानधन वाढवण्यात आलं.
नगरसेवकांना महापालिकेच्या बैठका, स्थायी समिती, महासभा किंवा इतर समित्यांच्या बैठकीत उपस्थित राहिल्याबद्दल बैठक भत्ता दिला जातो. हा भत्ता त्यांच्या एकूण उत्पन्नाचा भाग आहे.
नगरसेवकांना प्रवासासाठी प्रवास भत्ता देखील दिला जातो. हा भत्ता त्यांना त्यांच्या प्रभाग आणि महानगरपालिका मुख्यालयाच्या दरम्यान होणाऱ्या भेटी आणि कामकाजासाठी मदत करतो.
याशिवाय प्रत्येक नगरसेवकाला वार्षिक विकास निधी दिला जातो. हा निधी त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी वापरला जातो.