Jagdish Patil
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.
या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारला सुरूवात केली आहे. मात्र, सध्या मुंबई महापालिका सर्वाधिक चर्चेत आहे.
कारण BMC निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत तर भाजपनेही आपली पूर्ण ताकद लावली आहे.
याच निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई महापालिकेत महापौर कसा निवडला जातो ते जाणून घेऊया.
BMC मध्ये एकूण 227 प्रभाग असून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक विजयी होतात, त्यांचा महापौर बनतो.
महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी पालिकेच्या निवडणुकीनंतर पहिली विशेष सभा घेतली जाते.
या पहिल्या सभेत नगरसेवक 'हात उंचावून' मतदान करून महापौर आणि उपमहापौरांची निवड करतातय
महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढून आरक्षण निश्चित केले जाते.
नगरसेवक आणि महापालिकेचा कार्यकाळ महापालिकेच्या पहिल्या सभेपासून 5 वर्षांचा असतो.
मात्र, महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. 5 वर्षांच्या महापालिका कार्यकाळात दोन महापौरांची निवड केली जाते.