Aslam Shanedivan
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून मतदान १५ जानेवारीला होणार आहे.
यंदाची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याने आरक्षणानुसार उमेदवारांची वर्गवारी करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात आली आहे. ज्यात अ, ब, क आणि ड अशी रचना आहे.
चार नगरसेवक एकत्र आल्याने निधीचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रभावीपणे करता येते, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने मतदाराला अ, ब, क, आणि ड अशा चार उमेदवारांना मतदान करायचे आहे. म्हणजे चार वेळा मतदान करावे लागणार आहे.
पण जर एखाद्या ठिकाणी तीनच नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तिथे काय करायचे असा प्रश्न अनेकांना मनात उपस्थित झाला असेल. पण तेथेही तीनदा मतदान करावे लागेल.
ईव्हीएम मशीनमुळे मतदान अवैध होण्याचे प्रमाण नगण्य आहे. चारही मते देताना'बीप' आवाज आला, तरच ते मतदान वैध मानले जाईल.
प्रत्येक प्रभाग गटासाठी (अ, ब, क, ड) स्वतंत्र नोटा पर्याय उपलब्ध असेल. तेथेही चार वेळा नोटाचे बटण दाबावे लागणार आहे.