Ganesh Sonawane
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी आहे.
१३ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजल्यापासून शासनाने ड्राय डे लागू केला आहे.
१३ जानेवारी पासून १६ जानेवारीपर्यंत असे चार दिवस महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये ड्राय डे लागू असेल.
ज्या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे तेथील सर्व दारुची दुकाने व बार बंद राहतील.
हे नियम महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका क्षेत्रात राहतील, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख महानगरपालिका सामाविष्ट आहेत.
या काळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मद्यपाना वरील बंदीमुळे मतदारांना सुरक्षित मतदानाचे वातावरण मिळेल, तसेच निवडणुकीसंबंधी गैरप्रकार, गोंधळ आणि दंगली टाळता येतील. हा या मागील उद्देश आहे.