Nagpur Winter Session : महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्रात पत्रकारांचा गौरव; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र

आज (8 डिसेंबर) विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama

चर्चासत्र

‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama

मान्यवरांची उपस्थिती

या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama

अधिवेशनाच्या माध्यमातूव जनतेला न्याय

या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम होते.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama

राज्याच्या विकासाची बेरीज

या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करू या. विदर्भातील जनतेला या अधिवेशनाकडून अनेक अपेक्षा आहेत, असेही मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama

नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार

चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधान परिषद सदस्यांनी सहभाग घेतला होता.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama

पत्रकारांचा गौरव

कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

CMO Eknath Shinde winter Session | Sarkarnama