IAS Officer Namami Bansal: भांडी विक्रेत्याच्या मुलीची 'आयएएस'पदापर्यंतची 'फिनिक्स' भरारी...!

Deepak Kulkarni

परिस्थितीचं कडवं आव्हान....

तुमच्या आयुष्यातील संकटांना कधीच सांगायचं नसतं, परिस्थिती किती अवघड आहे. परिस्थितीला आपले कष्ट,जिद्द,सातत्यं यांंनी दाखवून द्यायचं, किती ध्येय त्यापेक्षा मोठं आहे. तसंच काहीसं एका आयएएस अधिकारीसाठी लागू होतं.

IAS Namami Bansal | Sarkarnama

उत्तराखंड ते IAS अधिकारी

उत्तराखंडमधील ऋषिकेश ते IAS अधिकारी होण्यापर्यंतचा नमामी बन्सलचा प्रवास नक्कीच संघर्षमय आणि अनेकांंना प्रेरणा देणारा असाच राहिला आहे.

IAS Namami Bansal | Sarkarnama

...आणि आयएएसपर्यंत मजल मारली

आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या नमामी यांनी आपल्या कुटुंबावर आपल्या शिक्षणाचं ओझं न टाकता यूपीएससीची वाट चोखाळली आणि आयएएसपर्यंत मजल मारली.

IAS Namami Bansal | Sarkarnama

वडिलांचा भांड्यांचा व्यवसाय

हृषिकेशची रहिवासी असलेल्या नमामी यांच्या वडिलांचा भांड्यांचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांंना त्यांच्या अभ्यासासाठी मोठा खर्च करणं जमणार नव्हतं.

IAS Namami Bansal | Sarkarnama

UPSC परीक्षेत तीन अयशस्वी प्रयत्न

अफाट जिद्दीच्या जोरावर UPSC नागरी सेवा परीक्षेत तीन अयशस्वी प्रयत्नांवर मात करून, तिने 2017 च्या परीक्षेत 17 वा क्रमांक मिळवला.

IAS Namami Bansal | Sarkarnama

सुवर्णपदक विजेती

अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नमामी या सुवर्णपदक विजेत्या आहेत.

IAS Namami Bansal | Sarkarnama

वाचन आणि लेखनाची आवड

वाचन आणि लेखनाची प्रचंड आवड आहे. शालेय जीवनात त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच राहिली आहे.

IAS Namami Bansal | Sarkarnama

सोशल मीडियावर मोठी क्रेझ

नमामि या उत्तम योगा करतात. त्यांची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे.

IAS Namami_Bansal | Sarkarnama

यशाचा कानमंत्रच...

अपयशापुढे न कधीच झुकायचं नाही हा यशाचा कानमंत्रच नमामी यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून दिला आहे.

IAS Namami Bansal | Sarkarnama

NEXT: NASA साठी जिवाची बाजी लावणाऱ्या सुनीता विल्यम्स यांना अमेरिका सरकार किती पगार देतं?

Sunita-Williams (1).jpeg | Sarkarnama
येथे क्लिक करा...