Roshan More
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर टोकरतलाव येथे जिल्हा परिषद शाळा आहे.
नंदुरबार हा आदिवसी जिल्हा आहे. येथे इंग्रजी माध्यमांच्या शाळा देखील आहेत. मात्र, जिल्हाधिकारी सेठी यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला.
मुलांना शाळेत सोडण्यासाठी जिल्हाधिकारी सेठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे स्वागत शाळेकडून करण्यात आले.
मिताली सेठी या 2017 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
सेठी या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्या चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
सेठी या आपल्या मुलांसोबतचे फोटो हे इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यांना गायनाची आवड असून गाणी गात असतानाचे व्हिडिओ देखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.