सरकारनामा ब्यूरो
माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार, नारायण राणे यांच्या आज वाढदिवसानिमित्त वाचा त्यांच्या शाळेतील रम्य आठवणी...
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यात त्यांच्या बेधडक वक्तृत्वामुळे खास ओळख निर्माण केली आहे. ते आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत.
एक कार्यकर्ता, ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा प्रवास असणाऱ्या राणेंचे शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण झाले. त्यानंतर घाटकोपर येथून अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
नारायण राणे यांनी एकदा सिंधुदुर्गातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शाळा आणि काॅलेजमधील काही भन्नाट किस्से सांगितले.
शालेय आठवणींना उजाळा :
विद्यार्थ्याशी संवाद साधत असताना विद्यार्थ्यांन त्यांना शालेय जीवनात तुम्ही कसे होतात असा प्रश्न विचारला त्यावेळी नारायण राणेंनी शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला.
शालेय जीवनात ते फक्त अभ्यास ऐके अभ्यास करायचे, ते खूप हुशार होते. सहसा कोणाशी मैत्री करायचे नाहीत. अशी एक आठवण त्यांनी सांगितली.
काही मित्र त्यांच्याशी स्वत:हून मैत्री करायचे, कारण परीक्षेवेळी नारायण राणेंच्या बाजुला बसल्यावर त्यांना बराच फायदा होईल असे वाटायचे, अशी एक आठवण त्यांनी सांगितली.
मुलांसाठी कठीण असणारा गणित विषय त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा होता. शाळेत दहावीला असताना कोरगावकार मॅडम म्हणून त्यांना शिक्षिका होत्या. त्या गणिताचा संग्रह माझ्याकडून जाणून घ्यायच्या, अस ते म्हणाले
'बराच वेळा मॅडम मला आदल्या दिवशी घरी बोलवून गणिताचा संग्रह समजावून घ्यायच्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन शिकवायच्या', असही राणे म्हणाले.