वयाच्या 15 व्या वर्षी पाहिला ; PM मोदींच्या मनावर कोरला गेलेला तो सिनेमा कोणता?

Ganesh Sonawane

आवड

2018 मध्ये लडाखहून काही विद्यार्थी मोदींना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना त्यांच्या सिनेमाच्या आवडीविषयी विचारलं होतं

Narendra Modi Favourite Movie | Sarkarnama

'गाईड'

त्यावर मोदींनी माझ्याकडे सिनेमा पाहण्यासाठी वेळ नाहीये. पण अभिनेते देव आनंद यांच्या 'गाईड' सिनेमाने माझ्या मनावर खूप प्रभाव पाडला होता, असं सांगितलं.

Narendra Modi Favourite Movie | Sarkarnama

देव आनंद

गाइड सिनेमात देव आनंद यांच्यासोबत वहिदा रेहमान यांनी काम केलं होतं. वयाच्या 15 व्या वर्षी मोदींनी हा सिनेमा पाहिला होता.

Narendra modi | sarkarnama

प्रभाव

त्या वयात गाइड सिनेमा पाहिल्यानंतर मनावर मोठा प्रभाव पडला होता, असं मोदींनी सांगितलं होतं. हा सिनेमा मोदींच्या विचारांना आणि सामाजिक दृष्टिकोनाला प्रेरणा देणारा ठरला.

PM Narendra Modi | Sarkarnama

1965

गाइड सिनेमा 1965 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन विजय आनंद यांनी केलं होतं. देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या अभिनयामुळे हा सिनेमा संस्मरणीय ठरला होता.

PM Narendra Modi | Sarkarnama

द गाइड

आरके नारायण यांच्या 1958 मधील द गाइड या कादंबरीवर हा सिनेमा आधारीत होता. या सिनेमाची कहाणी राजू नावाच्या एका टुरिस्ट गाइडच्या आवतीभोवती फिरते.

PM Modi | sarkarnama

मार्गदर्शन

प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंतर्मनातूनच मार्गदर्शन मिळतं, हा गाइड सिनेमाचा मूळ संदेश होता, असं मोदी म्हणाले होते.

PM Modi | Sarkarnama

दुष्काळ

सिनेमात गावात दाखवलेला दुष्काळ आणि पाण्याची टंचाई आदी दृश्यांचाही मोदींवर परिणाम झाला. ग्रामीण भागातील हे दाहक वास्तव त्यांच्या काळजाला भिडलं होतं.

PM Narendra Modi

NEXT : RSS ते PM पर्यंतचा प्रवास; नरेंद्र मोदींचे हे दुर्मीळ फोटो तुम्ही पाहिले आहेत का?

PM Narendra Modi 76th Birthday | Sarkarnama
येथे क्लिक करा