Rashmi Mane
2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी पांढरा खादी कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. यासोबतच त्यांनी भगवा आणि हिरवा जोधपुरी बांधेज फेटा बांधला होता.
2015 मध्ये पीएम मोदींनी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार पायजमा घातला होता, तसेच पंतप्रधानांनी खादी रंगाचे जाकीटही परिधान केले होते. पीएम मोदींनी केशरी बांधणीचा फेटा बांधला, ज्यावर लाल आणि हिरवे पट्टे होते.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साधा कुर्ता आणि चुरीदार पायजमामध्ये दिसले होते. याशिवाय लाल-गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा राजस्थानी फेटा बांधला होता.
2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुर्ता परिधान केला होता. यावर्षी पंतप्रधानांनी लाल आणि पिवळा रंगाचा फेटा घातला होता.
2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुल बाहीचा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यासोबत त्यांनी उपर्णाही घातले होते. यावर्षी पंतप्रधानांनी गडद केशरी आणि पांढऱ्या रंगाचा फेटा घातला होता.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुर्ता, पायजमा घातला होता. त्यावर पंतप्रधानांनी पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेरिया पॅटर्न असलेला फेटा घातला होता.
2020 मध्ये पीएम मोदींनी पांढऱ्या रंगाचा फेटा घातला होता. त्यावर केशरी रंगाचा लाल ठिपके असलेला फेटा घातला होता.
पांढरा कुर्ता आणि त्यावर केशरी रंगाचा फेटा घातला होता.
फिकट निळ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाचा मोदी जॅकेट घातलं होत.
2023 ला पंतप्रधान मोदींनी पांढरा कुर्ता काळ्या रंगाचं मोदी जॅकेट परिधान केलं होतं. त्यावर लाल रंगाचा फेटाही घातला होता.