Pradeep Pendhare
2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या राजकीय समीकरणांमध्ये थोडी गडबड झाली होती.
'चारसो पार'ची केलेली घोषणा जेमतेम 240 पर्यंत पोहोचली, पुन्हा चूक नको म्हणून खूणगाठ बांधत मोदींनी वाटचाल सुरू केली आहे.
पंतप्रधान मोदींना दोन गोष्टी 2029 मध्ये मिळवायच्या आहे. पहिली, पंडित जवाहरलाल नेहरूंचा पंतप्रधान पदांचा विक्रम मोडायचा आहे.
दुसरी साध्य करायची बाब म्हणजे, भाजपला 'चारसो पार' जागा मिळून द्यायच्या आहे.
वक्फ विधेयक दुरुस्ती म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2029 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती असल्याची चर्चा.
वक्फ विधेयक दुरुस्तीच्या चर्चेवेळी दोन्ही सभागृहात पंतप्रधान मोदी सभागृहात फिरकले नाहीत. विधेयक संमत होईल याबाबत मोदी आणि भाजप निश्चित होते.
बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जिंकल्या तर एनडीएवरील पंतप्रधान मोदी आणि भाजपचे पकड आणखी घट्ट होणार.
'2029'मध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाला दिलेली भेट.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोदींचा उत्तराधिकारी निवडावा लागणार आहे. आग्रहाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बसवले गेले ते पाहता मोदींनंतर कोण? याचे उत्तर संघाकडून शोधले जाणार.