सरकारनामा ब्यूरो
देशातील नवीन संसद भवनाचे, सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी अचानक नवीन संसद भवनाला भेट देण्यासाठी दाखल झाले. संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय आहे. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात.
नवीन संसद भवनातील विविध कामांची पंतप्रधान मोदींनी पाहणी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहात उपलब्ध असलेल्या सुविधाही त्यांनी पाहिल्या.
यावेळी मोदींनी बांधकामात गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला. संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय आहे.
मोदी यांनी या भेटीत तासाभराहून अधिक वेळ घालवला. तसेच प्रत्येक कामाचा तपशीलवार आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. हे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला सुमारे 1,200 कोटी रुपये देण्यात आलं.
सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. त्याचे शिल्पकार विमल पटेल आहेत.
नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे.