Ganesh Sonawane
2013 ते 2025 या काळात देशात झालेल्या सहा कुंभमेळ्यांवर सुमारे 18 हजार कोटी रुपये खर्च झाले. 2027 च्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभासाठी मात्र तब्बल 35 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
मागील 12 वर्षांतील सहा कुंभांच्या एकूण खर्चापेक्षा नाशिकचा खर्च जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे नाशिक कुंभ खर्चाच्या बाबतीत मोठा विक्रम ठरू शकतो.
2025 च्या प्रयागराज महाकुंभासाठी 7,303 कोटी रुपये खर्च झाले.
नाशिक कुंभासाठी यापेक्षा जवळपास पाचपट म्हणजे 35 हजार कोटी खर्च होणार आहेत.
2015 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभासाठी 2,379 कोटी रुपये खर्च झाले होते. 2027 मध्ये त्याच ठिकाणी तब्बल 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिक कुंभाच्या 35 हजार कोटींच्या आराखड्यात सर्वाधिक 51 टक्के निधी रस्त्यांसाठी आहे. यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांचा मोठा विकास होणार आहे.
साधू-महंतांसाठी साधुग्राम आणि तात्पुरत्या सुविधांवर 17 टक्के निधी खर्च होणार आहे. इमारती आणि संस्थात्मक सुविधांसाठी आणखी 9 टक्के निधी आहे.
पूल-उड्डाणपुलांसाठी 8 टक्के, तर वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्थेसाठी 3 टक्के निधी आहे. पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेसाठी 2 टक्के निधी खर्च होणार आहे.
नवीन घाट व नदीकाठाच्या कामांसाठी 2 टक्के, तर पोलिस आणि अग्निशमन व्यवस्थेसाठी 1 टक्का निधी आहे. म्हणजेच नाशिक कुंभासाठी यंदा 35 हजार कोटी खर्च केले जात आहे.