Ganesh Sonawane
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत एकूण 19 हजार 346 लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
केंद्र शासनाची ही योजना गर्भवती व स्तनदा मातांसाठी आहे.
पहिल्या अपत्यासाठी रुपये पाच हजार (दोन हप्त्यात) लाभ दिला जातो.
दुसरे अपत्य मुलगी असल्यास रुपये सहा हजार एक रकमी लाभ दिला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय 19 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक.
एमसीपी (MCP) कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक.
जिल्ह्यातील सर्व पात्र गर्भवती महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावर जाऊन त्वरित नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.