सरकारनामा ब्युरो
प्रमोद महाजनः भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन पत्रकार, शिक्षक आणि नंतर राजकारण असा प्रवास करत आधुनिक जगाचे राजकारणी झाले. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण पुर्ण केले. १९७० साली तरुण भारत या मराठी वृत्तपत्राचे ते उप-संपादक झाले.प्रमोद महाजन यांच्या दुरदृष्टीमुळे राज्यात १९९५ साली भाजपचे सरकार आले.
संजय राऊतः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकारितेची सुरूवात 'लोकप्रभा' या साप्ताहिकातून झली. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्राचे ते मुख्य संपादक आहेत. राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आले आहे.
सुर्यकांता पाटीलः नगरपालिकेचे सदस्य ते केंद्रिय मंत्री त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राजकारणात येण्या आधी त्या प्रकाशक होत्या. 'गोदीवरी टाइम्स' या वर्तमानपत्रातून त्यांनी पत्रकारितेची सुरूवात केली. राजकीय कारकिर्दीत त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या (राज्यमंत्री) आणि संसदीय कार्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
कुमार केतकरः मराठीतील पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. कुमार केतकर यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारी जाहिर केली होती. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होते. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकमत' 'दैनिक दिव्य मराठी' या वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणुन त्यांनी काम केले आहे.
इम्तियाज जलीलः एम. आय. एम. चे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा पत्रकारितेतूनच राजकारणात आले आहेत. इम्तियाज जलील यांनी 2014 साली पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. लोकमत आणि एनडीटीव्ही वाहिनीचे ब्युरो चीफ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
एम. जे. अकबरः देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री असणारे आणि मध्य प्रदेशातून भाजपचे खासदार झालेले एम. जे. अकबर हे पत्रकारितेतील मोठे नाव आहे. ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. भारतातील प्रमुख इंग्रजी नियतकालिक 'इंडीया टुडे'चे ते संपादक होते.
राजीव शुक्लाः राजकारणात येण्यापूर्वी ते 'जनसत्ता' या हिंदी दैनिकात पत्रकार होते. शुक्ल यांनी हे पद 1985 पर्यंत सांभाळले, त्यांची वरिष्ठ संपादक म्हणून नियुक्ती झाली आणि 2000 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. आता ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत.
कंवर संधूः यांच्या पत्रकारितेची सुरूवात इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र "द ट्रिब्यून" मधून झाली. नंतरच्या काळात त्यांनी 'इंडिया टुडे' 'इंडियन एक्स्प्रेस' आणि ‘हिंदुस्थान टाइम्स मध्ये निवासी संपादक म्हणूनही काम केले. 2017 मध्ये खरारमधून पंजाब विधानसभेच्या आम आदमी पक्षातर्फे सदस्य म्हणून निवडून आले होते.
शाझिया इल्मीः या एक भारतातील राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. राजकारात येण्या आधी त्या टेलिव्हिजन पत्रकार आणि 'स्टार न्यूज' या चॅनलवर अँकर होत्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत.