Rashmi Mane
ठाण्याच्या टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेला नवरात्रोत्सव यंदा अधिक भव्य आणि खास ठरणार आहे.
या वर्षी दक्षिण भारतातील बृहदेश्वर मंदिर आणि उत्तर भारतातील चारधाम यांचा अद्वितीय दर्शन अनुभव एका ठिकाणी मिळणार आहे.
1978 साली धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. यंदा 48 वे वर्ष साजरे केले जात आहे.
सामाजिक एकता वाढवणे आणि भाविकांचे प्रबोधन हा उद्देश ठेऊन हा उत्सव सुरू केला गेला.
या देखाव्यातील खास बाब म्हणजे तमिळनाडूतील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिरावर आधारित असून, 29 फूट उंच शिवलिंगाची प्रतिकृती साकाण्यात आली आहे.
तमिळनाडूतल्या प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित, शिवलिंगाची २९ फूट उंच प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मूळ मंदिराच्या सभोवताल चारधाम देवालये उभी करण्यात आले आहे.
देखाव्याचे काम मागील 2-3 महिन्यांपासून सुरू आहे. सध्या 200- 250 लोक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि अनेक कार्यकर्त्यांसह भक्तगण आवर्जून उपस्थित होते.