Rashmi Mane
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात महायुतीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे महायुतीत कोणता फॉर्म्युला समोर येणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत लोकसभेच्या जागांबद्दल चर्चा.
या बैठकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला सात जागा येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली.
येत्या काही दिवसांतच महायुतीच्या कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होईल.
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा कोणता उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार, यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे.
अजित पवारांनी आमदार, खासदार यांच्याबरोबर जागावाटप, उमेदवारी आणि लोकसभेच्यादृष्टीनं या बैठकीत चर्चा केली.
R