Deepak Kulkarni
२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे अजित पवारांचा जन्म झाला.
खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते असा अजित पवारांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या खांद्यावर सध्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि काका शरद पवार यांच्या सावलीत राहून स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
१९९१ साली अजित पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेवर निवडून गेले. त्याचवर्षी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
शरद पवार यांच्या विधानसभेच्या जागी अजित पवार विधानसभेवर निवडून गेले. १९९१ ते आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
१९९९ पासून २०२३ पर्यंत अजित पवारांकडे सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.
काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा राज्यातील तिन्ही प्रमुख पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी अजित पवार यांना मिळाली.
अजित पवार यांना त्यांच्या स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळेही ओळखलं जातं. यामुळे ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकलेले पाहायला मिळतं.
त्यानंतर २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.