Rashmi Mane
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार यांचा आज वाढदिवस आहे.
रोहित पवार यांनी पत्नी कुंती पवार यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलंय. तसंच त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छाही दिल्या आहेत.
संघर्षात लढण्यासाठी बळ देणारी दुर्गाही तूच आहेस… असं म्हणत रोहित पवार यांनी पोस्ट लिहिली आहे.
रोहित पवारांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
खरं तर जेव्हा रोहित पवार कुंती पवार यांना पहिल्यांदा भेटण्यासाठी गेले होते, तेव्हाच पाहता क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले होते.
तसं तर त्यांचं अरेंज मॅरेज होतं, पण पाहता क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते रोहित पवार.
रोहित यांचं लग्न पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर सतीश मगर यांची मुलगी कुंती यांच्याशी झालं आहे. त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुलं आहेत.
कुंती पवार यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयांत पदवी संपादन केली आहे.