Deepak Kulkarni
निर्मला येवले पुणे जिल्हातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण महिला सरपंच आहे.
त्या सोशल मीडियावर देखील कमालीच्या सक्रिय असतात.
त्यांनी B.E.ही शैक्षणिक पदवी मिळवली आहे. कारेगाव ग्रामपंचायतीवर त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली आहे.
मध्यंतरी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या कारणास्तव नवले यांना सरपंचपदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानं पुन्हा एकदा सरपंचपदी नवले विराजमान झाल्या आहेत.
महिलांचे सबलीकरण आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास या धोरणावर त्यांनी गावात मोठं बदल घडवण्याचा निर्धार केला आहे.
व्होकल टु ग्लोबल या विचारावर त्या गावचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
निवडणुकीच्या वेळीही युवक बदल घडवू शकतात याच मुद्यावर भर दिला होता.
पहिल्याच निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला.
नवले सोशल मीडियावर देखील खूपच प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्रामवर देखील त्यांना हजारो फाॅलोअर्स आहेत. आपली प्रत्येक गोष्ट त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात,