Rashmi Mane
संजय गांधी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे धाकटे पुत्र होते.
संजय गांधी यांचा जन्म 14 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे झाला.
संजय गांधी यांनी दिल्लीतील सेंट कोलंबिया स्कूल, डेहराडूनमधील वेल्हॅम बॉईज स्कूल आणि त्यानंतर डेहराडूनमधील दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
शालेय शिक्षणानंतर, संजय गांधी यांनी क्रेवे, इंग्लंडमध्ये रोल्स-रॉइसमध्ये शिक्षण घेतले.
संजय गांधी राजकारणी होण्याआधी एअरलाइन पायलट म्हणून करिअर करायचे होते.
1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींनी त्यांचा धाकटा मुलगा संजय गांधी यांना अमेठीतून उमेदवारी दिली. मात्र, त्यावेळी काँग्रेसचा पराभव झाला.
मारुती उद्योग संजय गांधी यांनी स्थापन केला होता.
संजय गांधी हे त्यांची आई इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख बनतील अशी अपेक्षा होती.
संजय गांधी यांची मे 1980 मध्ये काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संजय गांधी दिल्ली फ्लाइंग क्लबचे नवीन विमान उडवत होते आणि एरोबॅटिक स्टंट करत असताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.
23 जून 1980 रोजी नवी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा तात्काळ मृत्यू झाला.