Nirmala Sitharaman political journey : सेल्स गर्ल ते अर्थमंत्री ; जाणून घ्या त्यांचा थक्क करणारा प्रवास

सरकारनामा ब्यूरो

सेल्स गर्ल ते देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायक आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 

Nirmala Sitharaman | Sarkarnama

तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर निर्मला सीतारामन दिल्लीत आल्या आणि त्यांनी 1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

निर्मला सीतारामन ह्या जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची भेट परकला प्रभाकर यांच्याशी झाली. परकला प्रभाकर यांच्या कुटुंबात अनेक काँग्रेस नेते होते. तर परकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे संपर्क सल्लागार म्हणूनही काम केले.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

1986 मध्ये परकला प्रभाकर यांच्याशी लग्न झाले आणि त्या लंडनला गेल्या. लंडनला येऊन त्यांनी प्राइस वॉटरहाऊस येथे संशोधन आणि विश्लेषणामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. या ठिकाणी रुजू होण्यापूर्वी त्यांनी काही दिवस लंडनच्या रीजेंट स्ट्रीट येथील होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम केले. 

Nirmala Sitharaman | Sarkarnama

घरात काँग्रेसचे समर्थक असले तरी निर्मला यांनी 2006 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अवघ्या चार वर्षांत 2010 मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी निर्मला सीतारामन यांना भाजपच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सोपवली होती.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ लक्षात घेत त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

2014 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यासह त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य देखील होत्या. 2017 मध्ये त्या संरक्षण मंत्री होत्या. पूर्णवेळ संरक्षण मंत्रीपद भूषवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

फोर्ब्स या जगातील सर्वात लोकप्रिय मासिकाने जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. निर्मला सीतारामन यांनाही या यादीत समावेश झाला आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama
CTC image | Sarkarnama
येथे क्लिक करा