सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अमृतसरच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात गडकरींनी ICP अटारी येथे देशाचा सर्वोच्च राष्ट्रध्वज फडकवणार आहेत.
अटारी येथे जाण्याआधी नितीन गडकरी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले.
अटारी येथील या तिरंग्याची उंची 418 फूट आहे. हा तिरंगा पाकिस्तानपर्यंत स्पष्टपणे दिसणार आहे.
कॅबिनेट मंत्री कुलदीप धालीवाल आणि हरभजनसिंग ईटीओ यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार गुरजित औजला हेही घटनास्थळी हजर आहेत.
नितीन गडकरी यांनी आगामी काळात होणाऱ्या विकास प्रकल्पांचा आढावा या वेळी घेतला.