Highway NOC Portal: नितीन गडकरींकडून नवं पोर्टल लाँच, हायवेवर हॉटेल, पेट्रोल पंप यांसह स्वत:चा व्यवसाय सुरू करणं झालं सोपं

Deepak Kulkarni

'इन्फ्रा मॅन'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी त्यांच्या पायाभूत सुविधा जलद विकास, महामार्ग बांधणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ओळखले जाणारे 'इन्फ्रा मॅन' म्हणून ओळखले जातात.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

नवीन पोर्टलचे उद्घाटन

गडकरींनी एका नवीन पोर्टलचे उद्घाटन केले. या नवीन पोर्टलच्या लाँचिंगमुळे लोकांना मोठा फायदा होणार आहे.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

हायवेवर स्वतःचा व्यवसाय

यापुढे जर तुम्हाला देशातील राष्ट्रीय हायवेवर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आता कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तुम्हांला सामोरे जावे लागणार नाही.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

ना हरकत प्रमाणपत्रे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आता राजमार्ग प्रवेश पोर्टलची अत्याधुनिक आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. हे पोर्टल राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित ना हरकत प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक मान्यता मिळविण्याच्या प्रक्रिया सुलभ करणार आहे.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

विविध प्रकारच्या मंजुरी

हायवेवर विविध प्रकारच्या मंजुरी हे पोर्टल देणार आहे. महामार्गालगत भूखंड घेण्यास इच्छुक असलेले कोणीही येथे अर्ज करू शकतात.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

अर्ज दाखल करता येणार

सरकारच्या या नव्या पोर्टलमुळे पेट्रोल पंप, हॉटेल, विश्रांती गृह रस्त्याच्या कडेला सुविधा किंवा जोडणी रस्त्यासाठी देखील अर्ज दाखल करता येणार आहे.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

सहज NOC

हायवेच्या कडेला कोणताही नवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पेट्रोल पंप, हॉटेल किंवा फूड कोर्ट उघडण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यालयांच्या उंबरठे झिजवाव्या लागणार नाहीत.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

ऑनलाइन पोर्टल

केंद्र सरकारनं 'राजमार्ग प्रवेश' नावाचं नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केल्यामुळे आता प्रक्रिया वेगवान, पारदर्शकतेसह सहज असणार आहे.

Nitin Gadkari Rajmarg Pravaish Portal Launch | Sarkarnama

परवानग्या वेळेत देणं बंधनकारक

या पोर्टलवर दाखल अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइनरित्या तपासता येणार आहे. त्याचसोबत या परवानग्या वेळेत देणंही बंधनकारक असणार आहे.

Nitin-Gadkari-Rajmarg-Pravaish-Portal-Launch | Sarkarnama

NEXT: IAS, IPS अधिकाऱ्यांना मंत्री निलंबित, बडतर्फ करु शकतात का? नियम काय आहे?

येथे क्लिक करा....