Rashmi Mane
अभिनेत्री प्राजक्ता माळीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
प्राजक्ता माळीने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला आली होती. त्याचबरोबर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सहभागी झाली होती. त्यावेळी तिने नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
अर्ध्या तासाच्या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नितीन गडकरी यांनी प्राजक्ता माळीला खादीची साडी आणि त्यांच्यावर लिहिलेल्या विविध पुस्तकांची भेट दिली.
गरबा कार्यक्रमाच्या वेळी प्राजक्ता माळीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
प्राजक्ताने आपल्या नागपूर दौऱ्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सहभाग नोंदवला.
प्राजक्ता माळीने दसऱ्यानिमित्ताने ‘भोसले वंशीय- Maharaja of Nagpur; महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले त्यांचे चिरंजीव राजे जयसिंग व संघमित्रा यांचीही भेट घेतली.