Rashmi Mane
भाजपतर्फे नागपूरात काल ( 4 एप्रिल ) 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यात आली.
'आम्ही सारे सावरकर' अशी घोषणा देत नागरिक यात्रेत सहभागी झाले. यात्रेचे रूपांतर विराट सभेत झाले.
वीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ 'सावरकर गौरव यात्रे'साठी हजारो नागपूरकर शंकरनगर चौकात जमले.
या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
'मी सावरकर' अशी टोपी घालून नागरिक, पदाधिकारी, नेते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या यात्रेत सहभागी झाले.
“राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान करून आम्हाला सावरकर घराघरात पोहोचवण्याची व तरुणांपर्यंत घेऊन जाण्याची संधी दिली त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’. करा पक्ष बरबाद”, अशा गडकरी यांनी राहुल गांधींवर टीका केली.
नागपूरमध्ये निघालेल्या गौरव यात्रेत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदीसह सर्व आमदार, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होते.