Ganesh Sonawane
स्वीकृत नगरसेवक (Co-opted Councillor) म्हणजे, निवडणूक न लढवता, महानगरपालिका / नगरपरिषदेमध्ये कायद्यानुसार नेमलेला नगरसेवक.
काही वेळा नगरपालिकेत महिला, मागासवर्ग, तज्ज्ञ व्यक्ती किंवा अल्पसंख्याक घटकांचे प्रतिनिधित्व कमी असते. अशा वेळी नगरपालिका कायदा अंतर्गत ठराव करून काही सदस्यांना स्वीकृत (नियुक्त) नगरसेवक म्हणून घेतले जाते.
हे सदस्य मतदानाने निवडलेले नसतात, तर निवडून घेतलेले (नियुक्त) असतात.
निवडणूक न जिंकता, कायद्याने नगरपालिकेत सामावून घेतलेला सदस्य म्हणजे स्वीकृत नगरसेवक.
स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाइतकाच असतो.
मात्र, स्वीकृत नगरसेवकांना दोन महत्वाच्या मर्यादा असतात, त्या पुढीलप्रमाणे-
स्वीकृत नगरसेवकाला महापौर / उपमहापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो.
स्वीकृत नगरसेवकाला काही महत्वाच्या ठरावांमध्ये मतदान करता येत नाही. ही कायद्यानुसार मर्यादा आहे.