अनुराधा धावडे
महिला आरक्षण विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेत आणि राज्यसभेत हे महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होणार आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, भारताआधीच काही देश महिला प्रतिनिधित्वात सर्वात अग्रेसर आहेत.
महिला प्रतिनिधित्वात रवांडा पहिल्या क्रमांकावर असून, येथील संसदेत ६१ टक्के महिला प्रतिनिधी आहेत.
रवांडानंतर क्युबामध्ये पुरुष खासदारांच्या तुलनेत महिला खासदारांची संख्या जास्त म्हणजे ५३ टक्के इतकी आहे.
निकारागुआ देशाच्या संसदेत महिला खासदारांची संख्या ५२ टक्के इतकी आहे.
मेक्सिकोमध्ये महिला आणि पुरुष खासदारांची संख्या ५०-५० टक्के इतकी आहे.
न्यूझीलंडमध्येही महिला आणि पुरुष खासदारांची संख्या ५०-५० टक्के इतकी आहे.
विशेष म्हणजे भारताच्या शेजारचा देश पाकिस्तानातील संसदेतही २० टक्के महिला प्रतिनिधी आहेत.