CRPFच्या 150 पुरुषांच्या पथकाचं नेतृत्व करणारी 26 वर्षीय सिमरन बाला कोण?

Amit Ujagare

प्रजासत्ताक दिन परेड

दिल्लीत २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर आपल्या सैन्यदलाची ताकद दाखवली जाते. यामध्ये सैन्याच्या विविध तुकड्यांकडून परेडद्वारे मानवंदनाही दिली जाते.

Simran Bala

२६ वर्षांची महिला अधिकारी

यामध्ये CRPF अर्थात केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या तुकडीचं नेतृत्व यंदा २६ वर्षांच्या सीआरपीएफची महिला अधिकारी सिमरन बाला करणार आहेत.

Simran Bala

150 पुरुषांचं नेतृत्व

इतक्या कमी वयात सिमरन १५० पुरुषांच्या या तुकडीचं नेतृत्व करणार आहेत. यासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. यातून एक तगडा संदेशही दिला गेला आहे. या सिमरन बाला कोण आहेत? पाहुयात.

Simran Bala

सहाय्यक कमांडंट

सिमरन बाला (वय २६) या मुळच्या जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा इथल्या रहिवासी आहेत. त्या सध्या सीआरपीएफमध्ये सहाय्यक कमांडंटपदावर कार्यरत आहेत.

Simran Bala

पहिल्या महिला

जून २०२३ मध्ये त्यांची युपीएससीतून CAPF साठी निवड झाली, त्यांना ८२ वी रँक मिळाली होती. त्यावेळी त्या फक्त २३ वर्षांच्या होत्या. जम्मू-काश्मीरच्या त्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी ही परीक्षा पास केली आहे.

Simran Bala

जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण

सिमरन यांचं प्राथमिक शिक्षण हे राजौरी जिल्ह्यातच झालं. त्यानंतर त्यांनी जम्मूमध्ये पुढील शिक्षण घेतलं, पदवीचं शिक्षण त्यांनी गांधीनगरच्या सरकारी महिला कॉलेजमधून पूर्ण केलं.

Simran Bala

पहिल्याच प्रयत्नात यश

कॉलेजच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असताना त्यांनी UPSC-CAPF परीक्षेची तयारी सुरु केली, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा पासही केली.

Simran Bala

नक्षलविरोधी अभियान

त्यानंतर सिमरन बाला यांची २०२५ मध्ये CRPF मध्ये नियुक्ती करण्यात आली, इथं त्यांची छत्तीसगडच्या बस्तरिया बटालियनमध्ये नियुक्ती झाली. इथं नक्षलविरोधी अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

Simran Bala