सरकारनामा ब्यूरो
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस.
सर्वच स्तरांतून पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये स्थान आहे.
पंकजाताईंचे कार्यकर्ते तर त्यांच्याकडे राज्याच्या भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात.
पंकजा मुंडे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता त्यांच्या मुलासोबत तिरुपतीला दर्शनासाठी गेल्या आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजाताईंच्या बालपणीच्या काही खास आठवणींना उजाळा.
पंकजा या भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत.
जेव्हा त्यांचा जन्म होणार होता, तेव्हा प्रमोद महाजन यांनी आधीच नाव ठरवलं होतं.
जर मुलगा झाला तर त्याचं नाव कमल आणि मुलगी झाली तर तिचं नाव पंकजा ठेवलं जाईल असं त्यांनी आधीच सांगितलं होतं.
26 जुलै 1971ला परळीत डॉक्टर लोहिया हॉस्पिटलमध्ये मुंडे कुटुंबात एका चिमुकलीचा जन्म झाला आणि तिचं नाव पंकजा ठेवण्यात आलं.