सरकारनामा ब्यूरो
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र 'द यलो कीड' प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण ही दोन नावे त्यांसाठी पुरेसी आहेत.
व्यंगचित्रकार या पेशाला आर. के. लक्ष्मण यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. .
चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे
महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण, राज ठाकरे, मंगेश तेंंडूलकर या कलाकारांनी व्यंगचित्र्यामाध्यमातून अनेक राजकीय घटनांवर चपखल भाष्य केले आहे.
चाणाक्षपणा, उपजत विनोदबुध्दी, परिस्थितीचे अवलोकन, अचूक भाष्य करण्याची हातोटी या गुणांनीच कलाकार व्यंगचित्रातून रेखाटत असतात.