Rajanand More
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम मधील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच ओणम हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसह कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पारंपरिक ‘तिरुवातिरा’ नृत्य केले.
तिरुवनंतपुरमच्या जिल्हाधिकारी IAS अनु कुमारी यांनीही कर्मचाऱ्यांसोबत पारंपरिक नृत्य करण्याचा आनंद घेतला. त्यांच्या या नृत्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नृत्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. आनंद झाल्याचे सांगत अनु कुमारी यांनी ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केरळमध्ये ओणम हा सण साधारणपणे दहा दिवस साजरा केला जातो.२०२६ मध्ये ओणम उत्सवाची सुरुवात १६ ऑगस्टपासून झाली, ओणमचा मुख्य दिवस ‘थिरुवोणम’ २६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
अनु कुमारी या मुळच्या हरियाणातील सोनीपत येथील असून २०१८ बॅचच्या केरळ केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. UPSC परीक्षेत त्यांची दुसरी रँक होती.
उच्चशिक्षित असलेल्या अनु कुमारी यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून भौतिकशास्त्रात बीएस्सी ऑनर्स आणि नागपूरच्या आयएमटीमधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
यूपीएससी उत्तीर्ण होण्याआधी अनु कुमारी या एका खासगी बँकेत नोकरीत करत होत्या. सुमारे नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी २०२६ मध्ये यूपीएससीची तयारी केली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.
अनु कुमारी या २०२४ पासून जिल्हाधिकारी असून यापूर्वीही त्यांनी राज्यात अनेक महत्वाची पदे भूषवत आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.