ऑनलाईन बेटिंग अॅप्स होणार बंद! सरकारनं मंजूर केलं विधेयक, काय आहेत तरतुदी?

Amit Ujagare

विधेयकाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे.

Online Games

नियमावली लागू होणार

देशात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाइन बेटिंग अॅप्सवर नियम लागू करण्यावर या विधेयकाचा भर असेल.

Online Games

लोकसभेत मांडणार

हे विधेयक बुधवार, २० ऑगस्ट २०२५ रोजी लोकसभेत मांडले जाणार आहे.

Online Games

सेलिब्रेटिंकडं चौकशी

गेल्या काही महिन्यांत अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. तसंच या अ‍ॅप्सच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटिंची तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे.

Online Games

ऑनलाईन गेम्सवर बंदी

या विधेयकात अनधिकृत ऑनलाइन बेटिंगचा समावेश असलेल्या गेम्सवर बंदी घालण्याच्या तरतुदी देखील समाविष्ट आहेत.

Online Games

१४ कोटी बेटर

भारतात मोठ्या प्रमाणात लोकांना बेटिंगचं व्यसन लागलं आहे. DWच्या अहवालानुसार, १४ कोटींहून अधिक लोक नियमितपणे ऑनलाइन जुगार आणि बेटिंग करतात.

Online Games

IPL वेळी प्रमाणं वाढतं

इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारख्या मोठ्या स्पर्धांच्यावेळी हे ऑनलाईन बेटिंग किंवा जुगार खेळणाऱ्यांची संख्या ३७ कोटींच्या घरात पोहोचते.

Online Games

१०० अब्ज डॉलर उलाढाल

डिजिटल इंडिया फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, बेकायदेशीर बेटिंग अॅप्समध्ये जमा झालेल्या रकमेने १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.

Online Games

व्यसनापासून बचाव

त्यामुळं, सरकारसाठी जनतेला या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापासून वाचवण्याची आणि त्यांना फसवणुकीपासून दूर ठेवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज होती.

Online Games