अनुराधा धावडे
गेल्या 10 दिवसांपासून आफ्रिकन देश सुदान हिंसाचाराच्या आगीत जळत आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी भारत सरकारने आजपासून ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे
सुदान मध्ये तीन हजार भारतीय नागरिक अडकले आहेत आज भारत सरकारने आपल्या नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' सुरू केले आहे.
या ऑपरेशनअंतर्गत 500 भारतीय सुदानच्या बंदरावर पोहोचले आहेत.
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन देवी शक्ती' सुरू केले.
यानंतर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले.
याप्रमाणे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' सुरु केले आहे. ही कारवाई सागरी मार्गाने सुरू आहे.
अडकलेल्या लोकांना परत आणण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, भारताने सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात भारतीय हवाई दलाची दोन C-130J विमाने स्टँडबायवर ठेवली आहेत.
त्याचबरोबर INS सुमेधा सुदानमधील एका प्रमुख बंदरावर तैनात करण्यात आली आहे.
अडकलेल्या भारतीयांना प्रथम जेद्दाह येथे आणले जाईल आणि तेथून त्यांना विमानाने भारतात आणले जाईल.