Aslam Shanedivan
स्वत: अनाथ असणाऱ्या अमृता करवंदे यांची संघर्षाची कहाणी मन हेलावून टाकणारी असून त्यांनी अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण मिळवलं होतं.
2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री महोदय माझी जात कोणती? असा सवाल अमृता करवंदे यांनी करत अनाथांच्या हक्कासाठी लढा उभारला होता
त्यावेळी फडणवीस यांनी अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण घोषित करून ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मात्र मविआचे सरकार आले आणि हा निर्णय बदलला
आता मविआच्या निर्णयाविरोधात अमृता करवंदे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. फडणवीस सरकारने, सर्वार्थाने अनाथ असलेल्यांना ज्यांचे पालनपोषण अनाथाश्रमात झाले आहे. त्यांच्यासाठी हे आरक्षण लागू केलं होतं.
छोट्या दोन वर्षांच्या भावासह पाच वर्षाच्या अमृताला तिच्या वडिलांनी गोव्यातील ‘मातृछाया’ संस्थेत अनाथ म्हणून सोडले होते. त्यांची आई कॅन्सरशी झुंज देत होती.
अमृताचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण ‘मातृछाया’मध्ये पुढील शिक्षण पुण्यातील सेवासदन संस्थेत आणि दहावीनंतरचे शिक्षण अहमदनगरला केले.
अमृताचे ध्येय कलेक्टर बनण्याचे असल्याने तिने पुण्यात परत येऊन धुणी-भांडी करूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. याचवेळी इकॉनॉमिस्कमध्ये एमए करून सेट झाली. शिवाय एचआरमध्ये एमबीए केलं.
आता दिलेल्या MPSC परीक्षेत तिची महसूल सहायकपदी निवड झाली असून लवकरच नियुक्तीपत्रही मिळेल. यामुळे तिने दिलेल्या लढ्याला आता यश येणार आहे.