Rashmi Mane
2021 मध्ये तामिळनाडूतील कुन्नूर येथे देशाचे तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते.
या अपघातात बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 12 अधिकारी शहीद झाले होते.
शहीद जवानांमध्ये एक नाव होते ते स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह राव यांचे. आता त्याची पत्नी यशविनी ढाका हिने लष्करात अधिकारी होऊन पतीला दिलेले वचन पूर्ण केले आहे.
शहीद कुलदीप सिंह राव हे राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील घरदानाचे रहिवासी होते.
पतीच्या अखेरच्या प्रवासात यशविनी यांनी लष्करात भरती होण्याचे वचन दिले होते. लष्करी अधिकारी होऊन पतीला दिलेले वचन पूर्ण केले आहे.
अथक परिश्रमानंतर यश्विनीने पाच दिवसांची एसएसबी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली.
प्रचंड कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर यशविनी यांनी ही मजल मारली आहे.