सरकारनामा ब्यूरो
नागपूर, जिल्हा परिषदेच्या सीईओ IAS सौम्या शर्मा यांनी वयाच्या १६ व्या वर्षी श्रवणशक्ती गमावल्यानंतरही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निश्चय सोजला नाही.
त्या केवळ 'आयएएस' अधिकारी बनल्या नाही, तर 'यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस' परीक्षेत भारतात 9 वा क्रमांक मिळवून अव्वल ठरल्या आहेत.
सौम्या शर्माने चार महिनेच स्वयं अध्ययन केले. कोणत्याही कोचिंगला न जाता त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली होती.
सौम्या शर्मा या दिल्लीच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतूनच झाले.
सौम्या यांनी 'नॅशनल लॉ स्कूल'मध्ये पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड लॉ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. कायद्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी UPSC पास करून प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले होते.
जर तुम्हाला स्वयं-अध्ययनाच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास असेल तर कोचिंगची गरज नाही, असे सौम्या शर्माचे मत आहे.
IAS सौम्या शर्मा यांनी 2018 बॅचच्या IPS अर्चित चांडकशी लग्न केले. IAS सौम्या प्रमाणेच ते देखील महाराष्ट्र केडरचे आहेत.
अर्चित चांडकने 'आयआयटी' दिल्लीतून 'बीटेक' केले आहे. ही जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. दोघेही सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असतात.