Pradeep Pendhare
चाइल्ड पॉर्नोग्राफी डाउनलोड करणे किंवा पाहणे हा पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा आहे.
मद्रास हायकोर्टाने याआधी गुन्हा नसणार असलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केला.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने चाइल्ड पॉर्नोग्राफी गु्न्हा असल्याचा निर्णय दिला.
देशातील न्यायालयांनी चाइल्ड पॉर्नोग्राफी शब्दाऐवजी ‘बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक सामग्री’ असा शब्द वापरण्याचा आदेश
पॉक्सो (POCSO) कायद्यात सुधारणा करणं गरजेचं असून संसदेला दुरुस्ती आणण्याची सूचना
चाइल्ड पोर्नोग्राफीची व्याख्या 'बाल लैंगिक अत्याचार आणि शोषण' करणारी सामग्री म्हणून संबोधली जाणार
28 वर्षीय युवकानं चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित डेटा मोबाईलमध्ये ठेवल्याच्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल