Mayur Ratnaparkhe
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पी व्यंकट सत्यनारायण यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.
दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते परंतु त्यापैकी फक्त एकच निकष पूर्ण करत होता. त्यानंतर सत्यनारायण यांना विजेता घोषित करण्यात आले.
पी सत्यनारायण हे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पी सत्यनारायण यांचा चांगला संबंध आहे.
सध्या ते आंध्र प्रदेश भाजपचे राज्य शिस्त समितीचे अध्यक्ष आहेत.
सत्यनारायण हे २०१४ च्या निवडणुकीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा मसुदा समितीचा भाग होते.
तसेच इतर अनेक भूमिकांमध्येही त्यांनी भूमिका बजावल्या आहेत.
सत्यनारायण यांच्या निवडीमुळे आंध्र प्रदेशातील भाजपच्या राज्यसभा सदस्यांची संख्या दोन झाली आहे.
सत्यनारायण यांनी वयाच्या १५ व्यावर्षीच संघाचे काम सुरू केले होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी संघाच्या प्रचारात जोर लावला होता.
पी सत्यनारायण यांचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याशीही चांगले संबंध आहेत.