Deepak Kulkarni
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारच्या सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेतेमंडळी उपस्थित होते.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे.
एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार....
पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर केले.
हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावली होती.
एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित झाल्याचं पहिल्यांदाच पाहत असल्याचे गौरवोद्गार देखील अमित शाह यांनी या पुरस्कार सोहळ्यात काढले.
त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं असल्याचंही केंद्रीय मंत्री अमित शाह यावेळी म्हणाले.
मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे श्रेय नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित असल्याची भावना व्यक्त करतानाच पुरस्कारापेक्षा कार्य मोठं असंही आप्पासाहेब म्हणाले.