Rashmi Mane
फेउ थाई पक्षाचे नेते पटोंगटार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या नवीन पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
थायलंडच्या 31व्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. तसेच त्या थायलंडच्या सर्वात तरुण नेत्या आहेत.
माजी पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नुकतेच नैतिकतचे उल्लंघन केल्या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानंतर हटवण्यात आले होते.
शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत खासदारांनी शिनावात्रा यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड केली.
पटोंगटार्न शिनावात्रा या थायलंडच्या इतिहासातील दुसऱ्या महिला पंतप्रधान आहे.
पटोंगटार्न या माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत.
पंतप्रधानपदी निवडून आलेल्या त्यांच्या कुटुंबातील त्या तिसऱ्या नेत्या आहेत.